भाजप, शिंदे गटाला पाठिंबा देणार नाही : अंबादास दानवे

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत तोकडी साधने असतानाही शिवसेनेने चांगले यश मिळवलेे. जिल्हा परिषदेचे ९ सदस्य तर पंचायत समितीचे ११ सदस्य निवडून आले. शिवसेनेची भूमिका महत्वाची ठरणारी असली तरी जिल्हा परिषदेत भाजप आणि शिंदेगटाला पाठिंबा दिला जाणार नाही, असे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सिल्लोड वगळता इतर सर्व तालुक्यांत शिवसेनेला प्रतिनिधीत्व मिळाले आहे. जि.प., पंचायत समितीमध्ये पदाधिकार्‍यांची निवड करताना शिवसेनेची भूमिका महत्वाची ठरणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे सदस्य भाजप-शिंदेगटाला पाठिंबा देणार नाही, त्यांचा पाठिंबा घेणार नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेच्या टँकर लॉबीच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली.